Industrial AccidentLabour CodesNeoliberalismऔद्योगिक अपघातकामगार हक्कनवउदारवाद

अजून एक औद्योगिक अपघात ! अपघात नाही, नफ्याकरिता केलेले खूनच !

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष कामगार वर्गाला आवाहन करत आहे की कामाच्या जागी सुरक्षिततेकरिता सशक्त चळवळ उभी करत, मागणी करावी की जलदगती न्यायालयांद्वारे या आणि अशा सर्व औद्योगिक अपघातांची सुनावणी केली जावी आणि दोषींना कडक शिक्षा केली जावी !

Read More
Civil RightsDemocratic Rightsनागरी आणि लोकशाही हक्क

प्रसिद्ध शायर फैज़ अहमद फैज़ यांची अमर नज़्म ‘हम देखेंगे, लाज़िम है कि हम देखेंगे’ च्या सादरीकरणामुळे भावना भडकावल्याचा फॅसिस्टांचा हास्यास्पद आणि उथळ आरोप !

हे करत असताना फॅसिस्ट भाजप आणि संघ परिवाराकडून विचित्र आणि हास्यास्पद तर्क दिले जातात आणि आय टी सेलच्या वापरातून, गोदी मीडीयात बातम्या आणून, खोट्या प्रचाराद्वारे जनतेत पसरवले जाते. पुढे ह्याच तर्काचा वापर करून न्यायालयांवर दबावही आणले जातात. वरील प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत देखील तर्क देण्यात आला आहे की, भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना एका पाकिस्तानी शायर असलेल्या फैज़ अहमद फैज़ यांची प्रसिद्ध नज़्म ‘हम देखेंगे, लाज़िम है कि हम देखेंगे’ ह्या नज़्मच्या ओळी भावना भडकावणाऱ्या आहेत. त्यामुळे वरील प्रमाणे गुन्ह्याचे स्वरूप ठरवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर ही जगभरात प्रसिद्ध कविता आहे आणि दडपशाही करणाऱ्या सरकारांविरोधात सतत वापरली गेली आहे. भारतातही अनेक चळवळींनी ही कविता सतत वापरली आहे. ती अनेक महाविद्यालयीन अभ्यासक्रमांचा सुद्धा भाग राहिलेली आहे. खरेतर अशा हास्यास्पद कारवाईवर नागपूर खंडपीठाने पोलिसांना फटकार लावली पाहिजे, परंतु आजच्या काळात न्यायालयांकडून अशी आशा करणे अवघडच आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) अशा प्रकारच्या सर्वच दडपशाहीचा प्रखर विरोध करतो व प्रगतिशील, न्याय विवेकबुद्धी असलेल्या सर्वच नागरिकांना लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करतो.

Read More
Fascismफॅशिझम

पहलगाम हल्ला: फॅशिस्ट मोदी सरकार मृत्युंसाठी जबाबदार!

पहलगाम हल्ल्याच्या सर्व नागरिक बळींना आम्ही न्याय्य भरपाईची मागणी करतो. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आरएसएस-भाजप आणि गोदी मीडिया द्वारे धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पुरस्कृत राजकारणाला बळी पडता कामा नये. आम्ही ही मागणी करतो की भारतीय राज्यसत्तेने काश्मीरी जनतेचे दमन थांबवले पाहिजे! आम्ही भारताच्या जनतेला हे आवाहन करतो की या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या मोदी सरकारला धारेवर धरून जाब विचारावा!

Read More
CommunalismFascismफॅशिझमसांप्रदायिकता

धर्माध आणि अंधराष्ट्रवादाचे राजकारण हाणून पाडा ! बुलडोझर राज मुर्दाबाद! मालवण मधील पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे !

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष या मालवणमधील कष्टकरी कुटुंबावर झालेल्या बुलडोझर कारवाईचा तीव्र निषेध करत आहे. या प्रकरणात कायद्याची प्रक्रिया धाब्यावर बसवून मनमर्जीने दडपशाही करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहे. तसेच या कारवाईतून त्या कुटुंबाच्या झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई केली पाहिजे अशी मागणी करत आहे. आम्ही मागणी करत आहोत की मढी येथील ग्रामपंचायतीचा ठराव बेकायदेशीर घोषित केला जावा. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) महाराष्ट्रातील कामगार कष्टकरी जनतेला संघ-भाजप यांच्या धर्मांधतेच्या आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकारणाचे खरे चरित्र ओळखून त्याच्याशी संघर्ष करण्याचा आणि जाती धर्माच्या पलीकडे कामगार कष्टकऱ्यांची व्यापक एकता मजबूत करण्याचे आवाहन करत आहे.

Read More
Civil RightsDemocratic Rightsनागरी आणि लोकशाही हक्क

रविंद्र पोखरकरांच्या दमनाचा तीव्र निषेध! अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य टिकलेच पाहिजे! लोकशाही अधिकारांचे हनन नाही चालणार!

भारताच्या प्रत्येक नागरिकाला समाजातल्या कोणत्याही गोष्टीवर आपले मत मांडण्याचा लोकशाही अधिकार आहे. सरकारची किंवा कोणत्याही पक्षाची आणि विचारांवर टीका किंवा निषेध करण्याचा लोकशाही अधिकार आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (R.W.P.I.) रवींद्र पोखरकर यांच्या याच लोकशाही अधिकाराचे समर्थन करत भाजप द्वारे त्यांच्या दमनाचा जाहिर निषेध करत आहे व त्यांच्या विरोधात दाखल केलेला एफ. आय. आर. मागे घेण्याची मागणी करत आहे. गेल्या काही दशकांपासून हे दिसून आलेच आहे की कोणत्याही भांडवली राजकीय पक्षाकडून लोकशाही व नागरिक अधिकारांच्या दमनाविरुद्ध आवाज उठवण्याची अपेक्षा ठेवणे व्यर्थच आहे, कारण सर्वच पक्षांनी सत्तेत असताना स्वतःच असे दमन केले आहे. त्यामुळे आज न्यायप्रिय नागरिक, बुद्धिजीवी, विद्यार्थी व कष्टकरी जनतेने लोकशाही अधिकारांच्या दमनांच्या अशा प्रत्येक प्रयत्नाचा विरोध केला पाहिजे आणि लोकशाही-नागरी अधिकारांसाठी एक झुंजार लढा उभा करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

Read More
EducationFascism

शिक्षण संस्थांमध्ये फॅसिस्ट गुंडशाही नाही चालणार! विद्यापीठे लोकशाही युक्त, हिंसाचार मुक्त झालीच पाहिजेत !

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) या हल्ल्यांची कठोर निंदा करत असताना सर्व विद्यापीठांमध्ये लोकशाही-नागरी अधिकार बहाल करण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शिक्षणसंस्थांमधील सर्व न्यायप्रिय विद्यार्थी-शिक्षक-कर्मचारी यांना संघटित होण्याचे आणि फॅशिस्ट शक्तींविरोधात लढा उभारण्याचे आवाहन करत आहे.

Read More
Casteismजातीवाद

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीसी छळाचा आणि हत्येचा तीव्र निषेध!

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील हत्येचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पोलिस अधिकारी तसेच पुतळ्यावर जाणीवपूर्वक हल्ला करणारा दत्ता पवार यांच्यावर कठोर कारवाई करावी ही मागणी करत आहे. कोठडीतील छळ, कार्यकत्यांचे अटकसत्र, फॅसिस्ट भाजपकडून जनतेच्या अधिकारांचे दमन, जनतेच्या विरोध करण्याच्या अधिकाराचे दमन, आणि वाढते जातीय अत्याचार यावर एकच उपाय आहे, आणि तो आहे जातीय अस्मितांच्या नव्हे तर कामकरी वर्गाच्या एकतेवर आधारित जनांदोलन. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा आणि जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे.

Read More
Fascismफॅशिझम

महाराष्ट्रात महायुतीचा अपेक्षित मोठा विजय ! फॅशिझमला फक्त निवडणुकीच्या मार्गाने आव्हान देऊ पाहणाऱ्या उदारवाद्यांनी आत्मपरिक्षणाची गरज !

फॅशिस्ट शक्तींचे पुन्हा राज्यात सत्तेत येणे निश्चितपणे कामगार वर्गाकरिता मोठे आव्हान उभे करणार आहे. कामगार अधिकार, लोकशाही-नागरी अधिकार यांवरील हल्ला, जनांदोलनांचे दमन, प्रगतीशील व क्रांतिकारी विचारांचे दमन आता पुन्हा जोमाने पुढे जाणार आहे. या विरोधात जनतेच्या शक्तीला संघटित करण्याकरिता, फॅशिझमशी खऱ्या अर्थाने लढण्याकरिता, प्रगतीशील युवक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी मार्क्सवादाची कास धरल्याशिवाय आणि एका दीर्घकालिक लढ्याची पायाभरणी केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

Read More
Uncategorized

“Why build independent working-class power when we can reason with the bourgeoisie instead”, say CPI/CPI(M)!

The revolution for these parties is an abstract concept meant for some unknown future generation and not something which needs to be fought for and prepared for today. Today and the immediate future, for them, is a period of compromise, survival and peaceful struggle for whatever the system deems possible. If so-called “survival” is possible by compromising our integrity and revolutionary program by allying with the bourgeoisie, then so be it! says the CPI. The revolutionary workers and youth must reject these pseudo communist parties and maintain the political independence of the working class at all costs. As far as elections are concerned, they must put up their own candidates and use the opportunity for revolutionary propaganda.

Read More
Uncategorizedकामगार हक्क

Unite to Demand Justice for Anna Sebastian Perayil and Thousands of Others Who Are Murdered by the Capitalist System!

The heart-wrenching letter written by the mother of Anna Sebastian Perayil, a chartered accountant at Ernst and Young, addressed to the company’s CEO Rajiv Memani, regarding her daughter’s death due to overwork and stress has once again highlighted the exploitative conditions faced by workers under this system. Anna died from exhaustion, overwork, and anxiety caused by long working hours and immense work pressure. Like many others, she too attended a prestigious institute, paying lakhs in fees, and secured corporate job only to find herself working nearly the entire day to prove her worth to her bosses.

Read More