Uncategorized

बबन सोपान ठोके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

प्रस्थापित सर्व पक्ष हे भांडवलदार वर्गाच्या कोणत्या ना कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि निवडणुकीमध्ये जात, धर्म,भाषा,प्रांत,अस्मिता, पैसा , दारू अशामाध्यमांचा वापर करून जनतेला भुलवण्याचे काम ते आजपर्यंत करत आलेले आहेत; परंतु आता भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या स्वरूपात जनतेमध्ये एक खरा क्रांतिकारी कामगार वर्गीय पर्याय उपलब्ध आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष भांडवलदार वर्गाच्या कुठल्याही हिश्याकडून एक पैसाही निधी घेत नाही आणि पूर्णपणे सामान्य कष्टकरी मेहनती जनतेच्या घामाच्या कमाईतून उभा राहिलेला पक्ष आहे.

Read More
Uncategorized

उत्तर-पूर्व मुंबई सीटवर भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार बबन सोपान ठोके यांच्या थापी (करणी) चिन्हाचे बटन दाबा आणि त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करा

उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राहणारी मोठी लोकसंख्या ही कष्टकरी-कामगार आहेत; जे मुंबईला बनवण्याचे आणि चालवण्याचे काम करतात. पण त्यांनाच नरकापेक्षाही वाईट स्थितीमध्ये वस्त्यांमध्ये मुलभूत मानवी सुविधांपासून वंचित रहावे लागते. उत्तर-पूर्व मुंबईचा मानखुर्द भाग जेथे जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात, तेथेच मोठ्या संख्येने टीबीसारख्या धोकादायक रोगांनी लोक ग्रस्त आहेत. याच कष्टकरी जनतेला धर्म किंवा जाती आधारित अस्मितेच्या राजकारणात अडकवले जाते ज्यामुळे ती आपल्या खऱ्या मागण्यांपासून आणि मुद्यांपासून दूर जाते. याच गोष्टींना समोर ठेवून कष्टकरी जनतेच्या खऱ्या मुद्यांवर आम्ही निवडणूक लढवत आहोत.

Read More