Uncategorized

भाजपच्या नेतृत्वातील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय फॅसिझम विरोधी संघर्षाच्या नवीन पर्वाची सुरूवात आहे. ही हताश-निराश होण्याची वेळ नाही.

लोकसभा निवडणूक 2019 – विश्‍लेषण
भाजपच्या नेतृत्वातील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय फॅसिझम विरोधी संघर्षाच्या नवीन पर्वाची सुरूवात आहे. ही हताश-निराश होण्याची वेळ नाही.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) May 24, 2019

सतराव्या लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. भाजपला एकट्याला बहुमत मिळाले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 352 जागा मिळाले आहेत. काय कारण आहे की गेल्या पाच वर्षांमध्ये बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम तोडूनही भाजपला असा विजय मिळाला आहे? हे समजण्यासाठी आपण लेनिनचे कथन आठवले पाहिजे की शेवटी राजकारण निर्णायक असते, ना की अर्थशास्त्र. दोघांमध्ये नक्कीच एक नाते असते, पण आर्थिक कारणांचा राजकीय रूपात परिणाम समोर येईल हे अनेक कारणांवर अवलंबून असते. जे या गोष्टी समजू शकत नाहीयेत, ते भारतीय जनतेला दोष देत आहेत की तिने मोदीला कसे जिंकवून दिले! अशा लोकांना तर हेच म्हटले जाऊ शकते की त्यांनी नवीन जनता आणि नवीन देश निवडावा!

यामुळेच गरज आहे की सध्याच्या निवडणूक निकालांचे तार्किक विश्लेषण केले जावे आणि फॅसिझमला हरवण्याची ठोस रणनिती बनवली जावी. गेल्या पाच वर्षांमध्ये कामगार, शेतकरी, युवक, दलित, स्त्रिया आणि आदिवासींच्या अभूतपूर्व बरबादीनंतरही, मोदी सरकारने निवडणुकीत पुन्हा विजय मिळवण्याच्या कारणांचे विश्लेषण आवश्यक आहे, जेणेकरून क्रांतिकारी शक्ती येत्या पाच वर्षांमध्ये फॅसिस्ट हल्याचा मुकाबला करण्यासाठी आणि शेवटी फॅसिस्ट उभाराला हरवण्यासाठीच्या दूरगामी रणनितीवर परिणामकारक पद्धतीने काम करू शकतील. मोदीच्या विजयाचे सर्वात पहिले कारण म्हणजे जवळपास सर्वच मोठ्या भांडवलदार वर्गाचे एकमताने समर्थन. पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भांडवली लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये शेवटी विजय त्याचाच होतो, ज्याच्यामागे मोठ्या भांडवलदार वर्गाचे समर्थन असते. आपण सर्वच जाणतो की गेल्या पाच वर्षांमध्ये भारतातील सर्व मोठ्या भांडवलदार घराण्यांनी भाजपला सर्वाधिक निधी दिला आहे. ही रक्कम हजारो कोटींमध्ये आहे. माहिती असलेल्या स्त्रोतांशिवाय निवडणूक बॉंड्सच्या माध्यमातून सुद्धा देशी-विदेशी भांडवलदार आपली पूर्ण आर्थिक शक्ती घेऊन भाजपच्या मागे उभे होते. इतर भांडवली पक्ष या शर्यतीत कुठेतरी मागे पडले. इथपर्यंत की इतर सर्व भांडवली पक्षांना मिळालेला एकूण निधी एकट्या भाजपच्या कॉर्पोरेट निधीच्या एक चतुर्थांशही नव्हता. निवडणूक प्रचारामध्ये, मतांच्या खरेदी मध्ये, नकली उमेदवार उभे करून विरोधकांचे मतं कापण्यामध्ये, पैसे आणि दारू वाटण्यामध्ये, ईव्हीएमसोबत अत्यंत संघटीत पद्धतीने छेडछाड करणे वा बदलवण्यामध्ये, नोकरशहा आणि न्यायपालिकेला सुद्धा विकत घेण्यात आणि धमकावण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. भाजपकडे जेवढे धनबळ आहे, भारतीय भांडवली लोकशाहीच्या पूर्ण इतिहासात कोणत्याही भांडवली पक्षाकडे असे धनबळ नव्हते. भाजप या धनबळाच्या जोरावर वरील सर्व कारवाया करण्यात सफल राहिला. त्याच वेळी कॉंग्रेस, सपा-बसपा आघाडी, तृणमूल कॉंग्रेस असे सर्व पक्ष या शर्यतीत कुठेच नव्हते. धनबळाच्या व्यतिरिक्त यामध्ये एक कारण भाजपचे सुसंघटीत फॅसिस्ट तंत्र, संघटन आणि कार्यसंस्कृती सुद्धा आहे. पण सर्वात मोठे कारण भाजपला मोठ्या भांडवलदार वर्गाचे एकमत समर्थनच आहे. या एकमत समर्थनाचे कारण आहे संपूर्ण जगामध्ये भांडवली व्यवस्थेचे संकट, जे नफ्याच्या घसरत्या दरामध्ये प्रकट होत आहे. नफ्याच्या दराला वाढवण्यासाठी भांडवलदार वर्ग संपूर्ण जगामध्ये कामगार वर्गाची मजुरी कमी करण्याचे, कामाचे तास कायदेशीर किंवा बेकायदेशीर पद्धतीने वाढवण्याचे आणि श्रमाची सघनता वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. भांडवलदार वर्गाला माहित आहे की या प्रयत्नांविरोधात कामगार वर्ग गप्प बसणार नाही आणि विरोध व आंदोलन करेल. अशावेळी, भांडवलदार वर्गाला सर्व देशांमध्ये अशा सत्तेची गरज आहे जी हुकूमशाही पद्धतीने या विरोधाला चिरडून काढेल आणि जनतेला आपापसात वाटून विरोधाला विखरवून टाकेल. हेच कारण आहे की भांडवलदार वर्ग अमेरिका, तुर्कस्थान, फिलीपाईन्स, इंडोनेशिया, ग्रीस, हंगेरी आणि सोबतच भारतासारख्या सर्व देशांमध्ये अतिशय दक्षिणपंथी आणि फॅसिस्ट शक्तींना आपले एकमत समर्थन देत आहे.

भाजपला याच कारणामुळे सर्व कॉर्पोरेट जगाकडून मोठे आर्थिक समर्थन मिळाले आहे.

भाजपच्या विजयामागे दुसरे सर्वात मोठे कारण आहे या पक्षाचे इतर भांडवली पक्षांपेक्षा वेगळेपण – हा कोणताही सामान्य भांडवली पक्ष नाही, तर एक फॅसिस्ट भांडवली पक्ष आहे. याच्यामागे कॅडरची एक विशाल संरचना आहे, जिला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने जाणतो. फॅसिस्ट विचारधारेवर आधारित हे कॅडर हीच भाजपची सर्वात मोठी शक्ती आहे. इतर सर्व भांडवली पक्ष, मग ते कॉंग्रेस असो, सपा-बसपा असो, राष्ट्रवादी कॉंग्रेस वा तृणमूल, तेलगू देशम इत्यादी असोत, ते एका सचेतन विचारधारेवर आधारित आणि कॅडर वर आधारित पक्ष नाहीत. हेच कारण आहे की त्यांची संघटनात्मक रचनाही कधीच भाजप आणि संघ परिवाराच्या संघटनात्मक रचनेएवढी शिस्तबद्ध आणि प्रभावी असू शकत नाही. भाजप आपल्या अंधराष्ट्रवादी आणि धर्मवादी प्रचाराला जितक्या प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवू शकते, इतर सामान्य भांडवली पक्ष तितक्या प्रभावीपणे सामान्यत: हे काम करू शकत नाहीत. भाजपचे प्रचार तंत्र अयशस्वी तेव्हा होईल, जेव्हा विविध वस्तुगत आणि मनोगत कारणांमुळे, आर्थिक दैन्यावस्था आणि बरबादी कामगार वर्ग, सामान्य कष्टकरी आणि सोबतच सामान्य मध्यमवर्गाचे राजकीय मत निर्धारित करू लागतील; म्हणजे जेव्हा जनता आपल्या अवस्थेबद्दल राजकीय दृष्ट्या जागृत होईल आणि या चेतनेला प्रभावी बनवणाऱ्या राजकीय शक्ती अस्तित्वात असतील. विरोधी भांडवली पक्ष हे काम करण्यात पूर्णत: अयशस्वी ठरले, जरी असे करण्याच्या वस्तुगत अटी अस्तित्वात होत्या. ते अयशस्वी का राहिले, याचे सर्वात मोठे कारण मोठ्या भांडवलदार वर्गाच्या समर्थनाचा अभाव #होता#, ज्यावर आपण वर चर्चा केली आहे, पण सोबतच कॅडर आधारित संरचनेचा अभाव यामध्ये एक भुमिका निभावतो.

ही दोन प्रमुख कारणे आहेत, जी मोदीच्या या दुसऱ्या विजयामागे आहेत. इतर सर्व कारणे एकतर गौण आहेत, किंवा याच दोन कारणांचा परिणाम आहेत. उदाहरणार्थ, विरोधकांना आपल्या प्रचाराला तळागाळापर्यंत न पोहोचवता येणे किंवा प्रभावी न बनवता येणे. (हे भांडवलदार वर्गाच्या समर्थनाच्या कमीमुळे होते); मोदीच्या ‘करिश्मा’असलेले व्यक्तित्व आणि नेतृत्व (आपण सर्व जाणतोच की भांडवली मीडिया एका अत्यंत अज्ञानी आणि संस्कृतीविहीन व्यक्तीला सुद्धा ‘करिश्मा’ असलेले व्यक्तित्व म्हणून प्रस्तुत करू शकतो); राष्ट्रवादाला प्रमुख मुद्दा बनवण्यामध्ये आणि इतर वास्तव मुद्यांना बाजूला सारण्यात भाजपला आलेले यश (हे सुद्धा वरील दोन कारणांमुळेच शक्य होते), इत्यादी.

ईव्हीएम सोबत छेडछाड आणि तिला बदलवण्याच्या सर्व बातम्या याच दरम्यान समोर आल्या आहेत. ज्या प्रद्धतीने निवडणूक आयोग आणि भाजप व्हीव्हीपॅट पडताळणीच्या विरोधात होते, त्यावरून हे मानले जाऊ शकते की या बातम्यांमध्ये दम आहे आणि कुठेतरी ईव्हीएम घोटाळा सुद्धा भाजपच्या विजयामागे एक कारण आहे. पण हे प्रमुख कारण नाहीये. यामुळे भाजपच्या विजयाचा आकार नक्कीच वाढला असेल. पण या गोष्टीची शक्यता कमी आहे की भाजप केवळ ईव्हीएम घोटाळ्यामुळे जिंकला आहे. याशिवाय कदाचित भाजप स्वत:च्या हिमतीवर बहुमताला पोहोचू शकली नसती, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी तरीसुद्धा ओढूनताणून बहुमताजवळ पोहोचली असतीच, याची शक्यता जास्त वाटते. तरीही 100 टक्के व्हीव्हीपॅट पडताळणी अथवा पुन्हा मतपत्रिकांच्या व्यवस्थेची मागणी ही भांडवली लोकशाहीच्या कक्षेतील एक महत्वाची मागणी आहे आणि तिचे आपण पूर्ण समर्थन केले पाहिजे.

मोदीच्या यशाने हे स्पष्ट आहे की सर्व प्रकारचे उदार-डावे आणि डावे-उदारमतवादी कोणत्याही प्रकारे फॅसिझमच्या उभाराचा सामना करू शकत नाहीत. जिग्नेश मेवानी पासून ते कन्हैया कुमार पर्यंत, सर्व या प्रकारचे संधीसाधू नेते हाच विचार करत असतात की कोणत्याही प्रकारे बेरजेचे समीकरण करून भाजपला हरवले जाऊ शकते. यामध्ये अधिकांश दलित, मुस्लिम, आदिवासी, अतिमागास असे बेरजेचे समीकरण बनवण्याच्या प्रयत्नात होते. अशा तथाकथित डाव्या किंवा प्रगतीशील नेत्यांनी आंबेडकरवादी विचारधारेसमोर आणि राजकारणासमोर समर्पण करून आणि अस्मितेच्या राजकारणाचे तुष्टीकरण करून जिंकण्याचे स्वप्न जपले होते. त्यांना हे समजले पाहिजे की या रस्त्याने फॅसिझमला कधीच पराभूत करता येणार नाही. फॅसिझमाचे उत्तर फक्त आणि फक्त क्रांतिकारक कम्युनिस्ट मार्गानेच दिले जाऊ शकते. आजची गरज आहे की एका देशव्यापी क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाचे निर्माण जो की मार्क्सवादी-लेनिनवादी विचारधारेवर दृढतेने अंमल करत असेल, जो कॅडर आधारित असेल, आणि बोल्शेविक शिस्तीवर चालत असेल. अशाच एका पक्षाच्या नेतृत्वामध्ये एक झुंझार क्रांतिकारक जन आंदोलनाचे निर्माण फॅसिझमला निर्णायक मात देऊ शकते. हा एक दीर्घकालीक कार्यभार आहे, ज्यामध्ये प्रचंड श्रम, रक्त, घाम गाळावा लागेल आणि त्याग करावे लागतील. पण जे या दीर्घकालीक रस्त्याऐवजी कोणताही शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना नाउमेद आणि अपयशच मिळेल.

भारतातील नकली कम्युनिस्ट पक्षांची म्हणजे दुरूस्तीवादी पक्षांची जी अवस्था झाली आहे, तिचा अंदाज तर होताच. क्रांतीचा मार्ग सोडून दुरूस्तीवाद आणि अर्थवादाच्या मार्गाने गेलेल्या माकप, भाकप, भाकप(माले) लिबरेशन सारख्या पक्षांची स्थिती अगोदरपेक्षा जास्त खराब आहे. पश्चिम बंगाल मध्ये पाहू शकतो की डाव्या आघाडीचा संपूर्ण सामाजिक आधार भाजपच्या बाजूने गेला. भाजपला तृणमूल कॉंग्रेसच्या आधारावर घाव घालण्याची तितकी संधी मिळाली नाही जितकी डाव्या आघाडीचा आधार हिसकावून घेण्याची. खरेतर, पश्चिम बंगाल मध्ये भाजपच्या अभूतपूर्व कामगिरीमागे प्रमुख कारण हेच होते. अनेक ठिकाणी तर डाव्या आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते तृणमूल कॉंग्रेसला हरवण्यात आणि भाजपला जिंकवण्यात लागले होते. अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही कम्युनिस्ट पक्षाचे नाही तर दुरुस्तीवादी पक्षाचे असते; असा सामाजिक आधार कोणत्याही कम्युनिस्ट पक्षाचा नाही तर दुरूस्तीवादी पक्षाचा असतो. कारणे हे आहे की हे दुरूस्तीवादी पक्ष संधीसाधू पद्धतीने अर्थवाद आणि दुरूस्तीवादावर अंमल करतात, ना की क्रांतिकारक राजकीय प्रचार आणि कारवाईवर. परिणामी, यांचा सामाजिक आधार कोणत्याही जैविक रूपाने राजकीय सामाजिक आधार नसतो आणि तो कोणत्याही क्षणी सरकून सरळ दक्षिणपंथी आणि फॅसिस्टांच्या पक्षात जाऊ शकतो. पश्चिम बंगाल मध्ये हेच झाले आहे. केरळ मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंटद्वारे माकपच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटच्या विल्हेवाटीचे दुसऱ्या रुपाने हेच कारण आहे. एका रुपाने दुरूस्तीवादाचा हा ध्वंस क्रांतिकारी कम्युनिस्ट राजकारणासाठी चांगला आहे. तो जनतेमध्ये राजकीय विभ्रमाची स्थिती समाप्त करेल आणि क्रांतिकारी शक्तींसाठी राजकीय प्रचार आणि संघटन सोपे बनवेल. आम्ही माकप आणि भाकप सारख्या सर्व दुरुस्तीवादी पक्षांमध्ये आणि विशेषत: त्यांच्या विद्यार्थी आघाडीवर काम करणाऱ्या सर्व ईमानदार आणि प्रतिबद्ध कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना हाच संदेश देऊ इच्छितो की दुरूस्तीवादाला आणि त्याने कामगार वर्गाशी केलेल्या गद्दारीला ओळखा आणि क्रांतिकारी कम्युनिझमचा रस्ता निवडा. आज देशव्यापी स्तरावर एका नवीन क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्षाच्या निर्मितीची आवश्यकता आहे. असाच पक्ष फॅसिझमला निर्णायक रित्या हरवू शकतो.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (Revolutionary Workers’ Party of India, RWPI) असाच एक पर्याय उभा करण्याची सुरूवात आहे. RWPI ने सात लोकसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे केले होते: उत्तर-पूर्व दिल्ली आणि उत्तर-पश्चिम दिल्ली (दिल्ली), कुरूक्षेत्र आणि रोहतक (हरियाणा), उत्तर-पूर्व मुंबई आणि अहमदनगर (महाराष्ट्र), आणि महाराजगंज (उत्तर प्रदेश). या सर्व जागी अभियानांच्या दरम्यान पार्टीने आपला दूरगामी कार्यक्रम म्हणजे समाजवादी व्यवस्थेच्या निर्माणाचा कार्यक्रम आणि तात्कालिक कार्यक्रम, म्हणजे जनतेच्या सर्व ठोस प्रश्नांवर तात्कालिक उपाय आणि मदतीच्या कार्यक्रमाचा प्रचार केला आणि जनतेपर्यंत आपले मत पोहोचवले. या अभियानांना जनतेमधून सकारात्मक प्रतिक्रिया आणि सहयोग मिळाला. अनेक भागांमध्ये, विशेषत: अहमदनगर, महाराजगंज, कुरुक्षेत्र आणि उत्तर-पश्चिम दिल्ली मध्ये RWPI च्या उमेदवारांना ठीक-ठाक प्रमाणात मतं मिळाली आहेत. निकाल पूर्ण रुपात जाहीर झाल्यावर RWPI च्या पानावर मतांचे आकडे प्रकाशित केले जातील. पण भांडवली लोकशाही निवडणूकांमध्ये मतांची संख्याच कोणत्याही पक्षाचा वास्तविक आधार आणि समर्थन दाखवत नाही, जसे लेनिनने म्हटले होते. कोणताही संप किंवा आंदोलन अनेकदा या समर्थनला जास्त चांगल्या पद्धतीने दाखवतो. RWPI एक नव्याने स्थापन झालेला पक्ष आहे ज्याने पहिल्यांदा लोकसभा निवडणूकीत सहभाग केला. सध्या आपली ओळख निर्माण करण्याच्या टप्प्यावर हा पक्ष आहे. सर्व व्यापक कष्टकरी जनसमुदायापर्यंत या नावाला पोहोचवायला आणि स्थापित करण्याला वेळ लागेल, जे की अपेक्षित आहे, कारण कोणत्याही भांडवली घराण्याकडून, भांडवली निवडणूक ट्रस्टस कडून, एनजीओ, फंडींग एजंसींकडून वित्तीय समर्थनावर हा पक्ष टिकलेला नाही. पूर्ण निवडणूक प्रचार अभियान RWPI ने जनतेमधून आणि प्रगतीशील व्यक्तींकडून उभ्या केलेल्या सहयोगातून चालवले गेले आणि हे समजू शकतो की लोकसभेच्या प्रचंड मतदारसंघांना अशा प्रचाराने पूर्णत: सामावून घेणे सुद्धा शक्य झाले नसते. कॉर्पोरेट मीडियाचे समर्थन तुमच्याकडे नसते ज्याद्वारे की तुम्ही त्या लोकांपर्यंत आपले मत पोहोचवू शकाल, जिथे आपण स्वत: भौतिक रुपाने पोहोचू शकले नाहीत. हे सर्व प्रश्न असतानाही RWPI ला प्रचार अभियानात आणि अनेक लोकसभेच्या जागांवर मतांच्या रुपात सुद्धा जनतेचे चांगले समर्थन मिळाले आहे. येणाऱ्या काळात या कामगिरीला पक्ष अजून सुधारेल आणि भांडवली संसदेमध्ये कामगार वर्गाचे प्रतिनिधी आणि स्वर बनून पोहोचेल. येणाऱ्या काळात RWPI सामान्य कष्टकरी जनतेच्या सर्व प्रश्नांवर त्यांना गोलबंद आणि संघटीत करणे चालू ठेवेल आणि त्यांच्या राजकीय पर्यायाच्या स्वरूपात उभा राहील.