मनमानी पद्धतीने कलम 370 ला समाप्त करणे हा काश्मिरी जनतेशी केलेला ऐतिहासिक विश्वासघात
RWPI सर्व संघटक राष्ट्रांच्या स्वेच्छेच्या आधारावर सर्वाधिक शक्य अशा मोठ्या राज्याचे समर्थन करते आणि काश्मिरने वेगळे व्हावे ही इच्छा ठेवत नाही. परंतु प्रश्न कोणाच्या इच्छेचा किंवा अनिच्छेचा नाही. हे ठरवणे काश्मिरी लोकांचा अधिकार आहे की त्यांची नियती काय असावी, त्यामुळे त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळाला पाहिजे. मनमानी पद्धतीने कलम 370 समाप्त करून काश्मिरी जनतेसोबत ऐतिहासिक विश्वासघात करण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा समाप्त करून जम्मू-काश्मिरला दिल्ली आणि पॉंंडेचरी सारख्या अपुऱ्या अधिकारांच्या विधानसभांसारखे आणि लडाखला चंडीगढ सारख्या विधानसभा रहीत केंद्र शासित प्रदेशामध्ये परिवर्तित करण्यात आले आहे. याचा अर्थ हा आहे की तिथे सरळ केंद्राचे शासन असेल जे सामान्य जनतेची परकेपणाची भावना अजून वाढवेल तसेच चौका-चौकात सैन्य तैनात ठेवूनच हे सरकार चालू शकेल. इतिहास सांगतो की सैन्याच्या जोरावर कोणत्याही छोट्या भागातील पूर्ण लोकसंख्यला दीर्घकाळापर्य़ंत दाबून ठेवणे शक्य नाही. काश्मिर सुद्धा याला अपवाद नसेल.
Read More