भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय फॅसिझम विरोधी संघर्षाच्या नवीन पर्वाची सुरूवात आहे. ही हताश-निराश होण्याची वेळ नाही.
हा कोणताही सामान्य भांडवली पक्ष नाही, तर एक फॅसिस्ट भांडवली पक्ष आहे. याच्यामागे कॅडरची एक विशाल संरचना आहे, जिला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने जाणतो. फॅसिस्ट विचारधारेवर आधारित हे कॅडर हीच भाजपची सर्वात मोठी शक्ती आहे. इतर सर्व भांडवली पक्ष, मग ते कॉंग्रेस असो, सपा-बसपा असो, राष्ट्रवादी कॉंग्रेस वा तृणमूल, तेलगू देशम इत्यादी असोत, ते एका सचेतन विचारधारेवर आधारित आणि कॅडर वर आधारित पक्ष नाहीत. हेच कारण आहे की त्यांची संघटनात्मक रचनाही कधीच भाजप आणि संघ परिवाराच्या संघटनात्मक रचनेएवढी शिस्तबद्ध आणि प्रभावी असू शकत नाही. भाजप आपल्या अंधराष्ट्रवादी आणि धर्मवादी प्रचाराला जितक्या प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवू शकते, इतर सामान्य भांडवली पक्ष तितक्या प्रभावीपणे सामान्यत: हे काम करू शकत नाहीत.
Read More