उत्तर-पूर्व मुंबई सीटवर भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार बबन सोपान ठोके यांच्या थापी (करणी) चिन्हाचे बटन दाबा आणि त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करा
उत्तर-पूर्व मुंबई सीटवर भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार बबन सोपान ठोके यांच्या थापी (करणी) चिन्हाचे बटन दाबा आणि त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करा
थापी(करणी) चिन्हाला मत द्या! क्रांतिकारी कामगार पक्षाला साथ द्या! भ्रष्टाचारी-भांडवलदारांच्या निवडणूकबाज पक्षांना मात द्या !
कष्ट्करी भावा बहिणींनो,
29 एप्रिल रोजी मुंबई मध्ये लोकसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे. सर्व भांडवली पक्ष जनतेला भुलवू लागले आहेत. पण पर्याय काय आहे? कष्टकरी लोक आपल्या दिवसेंदिवस वाईट होत चाललेल्या स्थितीमध्ये परिवर्तनाच्या आशेने निवडणूकांमध्ये या ना त्या भांडवली निवडणूकबाज पक्षाला मत देत आले. पण या सर्व भांडवली निवडणूकबाज पक्षांनी सतत आपल्याला धोका दिला आहे. निवडणूक कोणताही पक्ष जिंको, हार तर आपलीच झाली आहे. का?
कांग्रेस,भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी,मनसे सारखे भांडवली निवडणूकबाज पक्ष आपले प्रतिनिधित्व का करू शकत नाहीत?
या सर्व पक्षांनी जात, धर्म, भाषा, प्रांताच्या नावावर आमचे मत तर घेतले पण आम्हाला गरिबी, बेरोजगारी, उपासमार, कुपोषण आणि असुरक्षितते शिवाय काहीच दिले नाही. का? कारण भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, सपा, बसपा, रिपाई सारख्या सर्व भांडवली पक्षांना फंडींग मिळते ते मोठमोठ्या कंपन्या, ठेकेदार, धनिक शेतकरी, बिल्डर, प्रॉपर्टी डिलर्स, शेअर दलालांकडून. भाजपला ‘व्हाईट’ मध्ये मिळालेल्या 1035 कोटी रुपयांपैकी, कॉंग्रेसला मिळालेल्या 200 कोटी रुपयांपैकी 95 टक्के निधी हा अंबानी, अडानी, भारती टॅलीकॉम, टाटा, बिर्ला, डीएलएफ, जिंदल, मित्तल सारख्या भांडवली धनपशूंनी दिला आहे. या भांडवलदारांनी सर्व निवडणूकबाज पक्षांना समाजसेवा करण्यासाठी तर पैसा नक्कीच नाही दिलेला. उलट यासाठी दिला आहे की सरकार कोणत्याही पक्षाचे बनो, पण सगळे कायदे त्यांच्या हितानुसारच बनावेत, गरिबांनी आवाज उचलला तर सरकारने त्यांच्यावर लाठ्या-गोळ्या चालवाव्यात. हेच तर मोदी सरकारने गेली 5 वर्षे केले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी येवोत, वा भाजप-शिवसेना, हे दोन्ही आपापल्या पद्धतीने भांडवलदार वर्गाचीच सेवा करतात. भांडवलदारांच्या नफ्याच्या रक्षणासाठी एकजूट, भांडवलदारांनी फेकलेल्या तुकड्यांवर पोसलेले हे सर्व भांडवली निवडणूकबाज पक्ष आमचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. संसदेत उपस्थित 83 टक्के खासदार करोडपती आहेत, आणि 143 खासदार उद्योगपती आहेत, ज्यापैकी 26 टक्के सत्तारूढ भाजपचे खासदार आहेत. यामुळेच सरकार कोणाचेही बनो, राज्य तर मालक वर्गच करतो. ते कधी आपले प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. हे मत घेतल्यावर आपली आठवण सुद्धा काढत नाहीत. अशामध्ये, या भांडवलदारांच्या निवडणूकबाज पक्षांना म्हणजेच भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे इत्यादींना मत देण्याचा अर्थ आहे आपल्या शत्रू असलेल्या मालक, ठेकेदार, जमीनदार, दलालांना मत देणे जे की आमचे शोषण-उत्पीडन करतात आणि आमच्या भयंकर अवस्थेला जबाबदार आहेत. एका नफाकेंद्रीत भांडवली व्यवस्थेमध्ये गरिबी, बेरोजगारी, महागाई, उपासमार यांच्यापासून कायमस्वरुपी सुटका शक्यच नाही. हे तर तेव्हाच होऊ शकते जेव्हा उप्तादन करणाऱ्या कामगार, गरिब शेतकरी, आणि निम्न-मध्यमवर्गीय कष्टकरी जनतेचा या देशातील उत्पादन, राज्यकारभार आणि समाजाच्या संरचनेवर ताबा असेल आणि निर्णय घेण्याची शक्ती खरोखर त्यांच्या हातात असेल. अशाच समाजाचे स्वप्न शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी पाहिले होते ज्यामध्ये सर्व कारखाने, शेतं , खाणींवर मेहनत करणाऱ्यांचा ताबा असेल, ना की काम न करणाऱ्या परजीवींचा! अशा परिवर्तनासाठी एका दीर्घकालीक लढ्याची आवश्यकता आहे. पण तो पर्यंत आपण चुप्प बसू शकतो का? नाही! तोपर्यंत आपण काय केले पाहिजे?
कामगार कष्टकऱ्यांच्या आपल्या पक्षाला, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाला (RWPI) मत द्या !
सध्या नफाकेंद्री व्यवस्थेमध्ये जे काही अधिकार कायद्याने आपल्याला मिळाले पाहिजेत ते आपल्याला भांडवली भ्रष्टाचारामुळे मिळत नाहीत. जोपर्यंत आपला, कष्टकऱ्यांचा आवाज संसद-विधानसभेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला स्वत:चा क्रांतिकारी पक्ष नसेल, तोपर्यंत आपल्याला हे अधिकार सुद्धा मिळणार नाहीत आणि आपलं ऐकणारं कोणीच नसेल. आपली सर्वात मोठी कमजोरी ही होती की आत्तापर्यंत आपल्याद्वारे बनवला गेलेला आणि आपल्या संसाधनांवर चालणारा कोणताच राजकीय पक्ष नव्हता. याच कमजोरीला दूर करण्यासाठी देशभरातील कष्टकऱ्यांनी आपल्या क्रांतिकारी पक्षाची स्थापना केली आहे, ज्याचे नाव आहे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (Revolutionary Workers’ Party of India – RWPI). हा पक्ष कष्टकरी जनतेमधून एकत्र केलेल्या निधीतूनच काम करतो आणि कोणतीही देशी–विदेशी कंपनी, ठेकेदार, दलाल, एनजीओ, फंडींग एजंसीकडून दान घेत नाही. या पक्षाचे नेतृत्व आणि सदस्यता भांडवलदार वर्गातून नाही तर सामान्य कष्टकरी जनता आणि तिच्या संघटकांमधूनच येते. हेच कारण आहे की हा पक्ष पथभ्रष्ट होणार नाही आणि खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करेल. आपण निवडणुकीच्या राजकारणाचे मैदान भांडवली पक्षांसाठी सोडू शकत नाही. निवडणुकांमध्ये, संसद आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपला स्वतंत्र राजकीय पक्ष असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण भांडवली व्यवस्थेअंतर्गत जे अधिकार शक्य आहेत ते मिळवू शकतो, भ्रष्टाचाराला रोकू शकतो, या किंवा त्या भांडवली पक्षाचे शेपूट बनणे टाळू शकतो, आपण आपला रोजगार, निर्वाह, शिक्षण आणि इलाजाचा अधिकार मिळवू शकतो. यामुळेच आम्ही सर्व कष्ट्करी भावा बहिणींना आवाहन करत आहोत की भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे (RWPI) चे व्हॉलंटियर (स्वयंसेवक) बना, RWPI ला सर्व प्रकारे समर्थन द्या, आणि 29 एप्रिल रोजी एकजूट होऊन RWPI ला मत द्या.
RWPI खालील प्रमुख राष्ट्रीय मागण्यांना घेऊन या निवडणुकीत कामगार-वर्गीय हस्तक्षेप करत आहे:
- भगत सिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा पास करा, ज्याद्वारे सर्वांना वर्षभर कायम रोजगार किंवा रु. 10,000 प्रतिमहिना बेरोजगारी भत्ता देणे सरकारची जबाबदारी असेल.
- सर्व प्रकारच्या नियमित कामांमधून ठेकेदारी प्रथा पूर्णत: समाप्त करा. तसेच राष्ट्रीय किमान वेतन कमीतकमी रु. 20,000 प्रति महिना करा. कामाचे तास 6 केले जावेत.
- प्राथमिक ते उच्च स्तरावर सर्वांना समान आणि मोफत शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असेल.
- सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे सर्वांना समान आणि नि:शुल्क इलाजाची जबाबदारी सरकार घेईल.
- कर्ज बुडवणाऱ्या सर्व कंपन्यांचे तत्काळ राष्ट्रीयीकरण केले जाईल.
- सर्व कष्टकरी जनतेसाठी सरकारी घरकुलांची व्यवस्था असेल.
- राफेल घोटाळ्यांसहीत मोदी सरकारच्या सर्व घोटाळ्यांची तत्काळ उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी केली जाईल.
- अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांसोबत सर्व योजना-कामगारांना तात्काळ कायम केले जाईल.
उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास RWPI चा खासदार काय करेल ?
उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राहणारी मोठी लोकसंख्या ही कष्टकरी-कामगार आहेत; जे मुंबईला बनवण्याचे आणि चालवण्याचे काम करतात. पण त्यांनाच नरकापेक्षाही वाईट स्थितीमध्ये वस्त्यांमध्ये मुलभूत मानवी सुविधांपासून वंचित रहावे लागते. उत्तर-पूर्व मुंबईचा मानखुर्द भाग जेथे जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात, तेथेच मोठ्या संख्येने टीबीसारख्या धोकादायक रोगांनी लोक ग्रस्त आहेत. याच कष्टकरी जनतेला धर्म किंवा जाती आधारित अस्मितेच्या राजकारणात अडकवले जाते ज्यामुळे ती आपल्या खऱ्या मागण्यांपासून आणि मुद्यांपासून दूर जाते. याच गोष्टींना समोर ठेवून कष्टकरी जनतेच्या खऱ्या मुद्यांवर आम्ही निवडणूक लढवत आहोत. जर आम्ही जिंकलो, तर खालील कामं तातडीनं केली जातील.
- सर्व झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालयांची व्यवस्था केली जाईल.
- चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या सरकारी शाळांचे निर्माण केले जाईल.
- दवाखाने आणि डिस्पेंसरी निर्माणे केले जातील तसेच नि:शुल्क अॅंब्युलन्स आणि शव वाहन सेवेची व्यवस्था केली जाईल.
- सार्वजनिक पुस्तकालये आणि वाचनालयांचे निर्माण केले जाईल.
- मानखुर्द-शिवाजीनगर, मुलुंड आणि विक्रोळी मध्ये रेल्वे रुळांवर तत्काळ पादचारी पूल निर्माण केले जातील.
- सर्व मजूर अड्यांवर शेड, बेंच आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल तसेच लेबर एक्सचेंज बनवले जाईल जेणेकरून मजूर अड्यांवर कामगारांचे शोषण थांबवले जावे.
- देवनार आणि मुलूंड डंपिंग झोनला त्वरीत बंद केले जाईल.
- मानखुर्द मधील प्रदूषणकारी बायो-वेस्ट ट्रीटमेंट प्लॅंट (SMS Company) लगेच बंद केला जाईल.
- प्रत्येक गल्लीत, गल्ली-जनसमित्या स्थापन केल्या जातील आणि खासदार विकास निधी आणि इतर विकास निधींची रक्कम कशी आणि कोणत्या विकास कामांवर खर्च करावी, याचा निर्णय या जनसमित्या घेतील.
- प्रत्येक खासदाराचा निधी आणि इतर सर्व विकासाच्या निधींचा सार्वजनिक हिशोब (पब्लिक ऑडीट) केले जाईल.
- आमचा खासदार एका कुशल कामगारा एवढाच पगार घेईल आणि बाकी सर्व रक्कम विकास निधी मध्ये देईल.

उत्तर-पूर्व मुंबई सीटवर निवडणूक लढणारे आमचे उमेदवार बबन सोपान ठोके हे लल्लुभाई कंपाऊंड मध्ये राहतात आणि ते ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी अनेक वर्षे एक कामगार म्हणून काम केले आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून कामगार आंदोलन तसेच विद्यार्थी-युवक आंदोलनात सक्रीय आणि नेतृत्वकारी भागीदारी केली आहे. आम्ही सर्व कष्टकरी-कामगार आणि सर्व न्यायप्रिय व प्रगतीशील मतदारांना आवाहन करतो की कामगार कष्टकऱ्यांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार बबन सोपान ठोके यांच्या थापी (करणी) चिन्हाचे बटन दाबा आणि त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करा.
क्रांतिकारी कामगार पक्षाला मत द्या! भांडवलशाहीला मात द्या!
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI)
केंद्रिय पत्ता : बी-100, मुकुन्द विहार, करावलनगर, दिल्ली-110094
पता : रूम न. -204, बिल्डिंग न.7बी, हीरानन्दानी बिल्डिंग, लल्लूभाई कंपाउंड, मानखुर्द, मुंबई – 400043 संपर्क:9145332849, 9619039793(w) ईमेल:contact.rwpi@gmail.com वेबसाइट: rwpi.org टि्वटर: twitter.com/rwpiorg
फेसबुक पेज: facebook.com/revolutionaryworkerspartyofindia इंस्टाग्राम: instagram.com/rwpindia
