Civil Rights

Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!

आज भांडवलदार वर्गाचे आंतरिक आर्थिक-राजकीय संकट तीव्र होत असताना, भांडवलदार वर्गाच्याच इतर नेत्यांचे दमन सुद्धा करण्याकडे तो जात आहे, आणि ईडी-सीबीआय सारख्या यंत्रणा वापरून एकाधिकारी फॅशिस्ट राजवटीला मजबूत केले जात आहे. “निर्भय बनो” सारख्या भांडवली/निम्न-भांडवली विचारांच्या कार्यक्रमांचे, आयोजकांच्या लोकशाही अधिकारांचे दमन केले जाते, तेव्हा अशा लोकशाही-नागरी अधिकारांच्या हननाचा फटका सर्वाधिक कामगार वर्गालाच बसत असतो, कारण अशाप्रकारे त्याच्याही अधिकारांवर हल्ला होत असतो. तेव्हा या अधिकारांच्या होणाऱ्या कोणत्याही हननाविरोधात बोलणे हे कामगार-कष्टकरी वर्गाचे कर्तव्य आहे . या घटनेनंतर उदारवादी भ्रम मनात बाळगणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींनी, कामगार-कष्टकऱ्यांनी सुद्धा फॅशिझमच्या खऱ्या चरित्रावर विचार केला पाहिजे, आणि सर्वधर्मसमभावाच्या नकली धर्मनिरपेक्षतेचे राग आळवणे बंद करून, तकलादू लोकशाही-नागरी संविधानिक अधिकारांच्या भरवशावर न बसता, आपली रस्त्यावरील शक्ती मजबूत करत फॅशिस्ट गुंडांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली पाहिजे.

Read More